बदलत्या काळातील स्त्री-पुरुष संबंध
वंदना सुधीर कुलकर्णी
०६ ऑगस्ट २०२०
भारतात स्त्री-पुरुष नातं म्हणजे पती-पत्नीचं नातं असंच रूढार्थानं समजलं जातं. त्याअर्थी ह्या नात्याला दिलेलं ते सामान्य नामच म्हणायचं! आणि पती-पत्नीचं नातं म्हणजे निरोगी, सुदृढ पुरुष-स्त्री नातं असं विधान करणं धाडसाचंच होईल! किंबहुना बहुतांशी लग्नात वैवाहिक नातं आणि स्त्री-पुरुष निकोप नातं यांची फारकतच होताना दिसते. स्त्री-पुरुष नात्याला अशा पद्धतीने पती-पत्नी नात्यात बद्ध केल्यामुळे आणि त्याला एक …